सोने-चांदी पुन्हा महागली : वाचा प्रति तोळ्याचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । अर्थव्यवस्था सावरत असली तरी दुसऱ्या बाजुला करोनाच्य डेल्टा व्हेरिएंटचे संकट कायम आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतींत चढ उतार दिसून येत आहेत. आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ३० रुपयाने महागले आहे. तर चांदीचा  प्रति एक किलो ५६० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल देखील सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविली गेली होती. काल मंगळवारी सोने ४४० रुपयाने तर चांदी १२३० रुपयाने महागली होती.

कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

जळगाव सराफ बाजारात गेल्या दोन दिवसात सोने प्रति १० ग्रॅम ५१० रुपयाने तर चांदी १७९० रुपयापर्यंत वधारले आले.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

दरम्यान, १६ जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८७३ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,७३० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,९६० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar