⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

खरेदीची सुवर्णसंधी…सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; वाचा आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । मागील गेल्या तीन दिवसापासून जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोन्याच्या दरात वाढ नोंदविली गेली होती. परंतु आज सोन्याच्या दर वाढीला ब्रेक लागला आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोबतच चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ६३० रुपयाने घसरली आहे. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ४०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४० रुपयाने तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ७५० रुपयाने महागली होती.

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ झाली होती. या तीन दिवसात प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७१० रुपयाची वाढ झाली होती. सोबतच चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते. या आठवड्यात चांदी दोन महागली होती. जवळपास १६०० रुपयांची वाढ चांदीच्या भावात झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज (२४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,२१० रुपये इतका आहे.

२० ते २४ सप्टेंबरपर्यंत असे होते सोन्याचे दर :

जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर आज शुक्रवारी आज (२४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१४० रुपये इतका आहे.

२० ते २४ सप्टेंबरपर्यंत असे होते चांदीचे दर :

तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी चढ-उतार दिसून आलीय. सोमवारी (२० सप्टेंबर) चांदीच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे  सोमवारी (२० सप्टेंबर) चांदीच्या प्रति किलोचा भाव ६१,४०० रुपये इतका होता. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) ६१,०१० इतका होता. बुधवारी चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव ६१,८६० रुपये इतका होता. गुरुवारी (२३ सप्टेंबर) चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६१० रुपये इतका आहे. तर आज (२४ सप्टेंबर) चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,२१० रुपये इतका आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने ४७,७३० रुपयांवर आले आहे, म्हणजेच गेल्या 1 वर्षात सोने ९००० रुपयांहुन अधिकने स्वस्त झाले आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सर्वकालीन उच्च पातळी ७९,९८० रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदीदेखील १७,६५० हजाराहून अधिक रुपयाने स्वस्त झाली आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.