⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

खुशखबर.. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घट

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दरात घसरण दिसून आलीय. आज सोन्याच्या भावात १३० रुपयाची घसरण दिसून आलीय. तर चांदीच्या भावात ५८० रुपयाची घसरण झालीय. गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या मोठी वाढ झालीय. गेल्या १५ दिवसांमध्ये चांदी तब्बल ५७०० रुपयांनी महागली आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :
आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,३८० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,३३० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आलीय. जळगाव बाजारात गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात ४१८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सोने देखील महागले आहे. गेल्या आठवड्यात सोने चार वेळा महागले आहे. त्यात ६१० रुपयाने सोने महागले आहे. तर गेल्या १५ दिवसांमध्ये सोने १००० हजार रुपयापर्यंत महागले तर चांदी तब्बल ५७०० रुपयांनी महागली आहे.

गेल्या आठवड्यातील दर?

१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला. २० जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,५१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६५,९१० रुपये इतका नोंदविला गेला

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

हे देखील वाचा :