Gold-Silver Price : आजचा सोने-चांदीचा भाव, २४ डिसेंबर २०२१

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात किंचित ५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात १२० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल सोने (Gold) १४० रुपयाने महागले होते; तर चांदी (Silver) प्रति किलो ४०० रुपयांनी महागली होती. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती महाग होऊ शकतात, असा अंदाज आहे.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,२८० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,७७० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.-

सध्या देशात ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. नजीकच्या काळात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात. गेल्या ५ दिवसात सराफ बाजारात सोने ४ वेळा स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी २ वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे.

२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला. २३ डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६५० रुपये इतका नोंदविला गेला.

तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते…
देशात चार प्रकारचे सोने मिळतेआपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना ‘बनविले’ जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -