fbpx

सोने-चांदीचे दर पुन्हा वाढले ; वाचा आजचे प्रति १० ग्रॅमचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव वधारला आहे. सोबतच चांदी देखील महागली आहे. आज गुरुवारी जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ४० रुपयाने महागली आहे. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ७५० रुपयाने महागली आहे. त्यामुळे आज २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६१० रुपये इतका आहे.

दरम्यान, काल देखील दोन्ही धातूंचे दर वाढले होते. काल बुधवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत ३७० रुपयाने तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ८५० रुपयाने महागली होती.

mi advt

सोमवार ते गुरुवारपर्यंतचे दर 

जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७७० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६१० रुपये इतका आहे. गेल्या तीन दिवसात प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७१० रुपयाची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी चढ-उतार दिसून आलीय. गेल्या दोन दिवसात चांदीच्या भावात १६०० रुपयाची वाढ झाली आहे. सोमवारी (२० सप्टेंबर) चांदीच्या प्रति किलोचा भाव ६१,४०० रुपये इतका होता. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) ६१,०१० इतका होता. बुधवारी  चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव ६१,८६० रुपये इतका होता. आज चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६१० रुपये इतका आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने ४७,७३० रुपयांवर आले आहे, म्हणजेच गेल्या 1 वर्षात सोने ८,४३० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सर्वकालीन उच्च पातळी ७९,९८० रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदीदेखील १७ ,२५० हजाराहून अधिक रुपयाने स्वस्त झाली आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज