⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सोने-चांदी खरेदी करताय ; आधी जाणून घ्या जळगावातील आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । जळगावातील सुवर्णबाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा चा भाव जैसे थे आहे. तर चांदीचा देखील भाव स्थिर आहे. काल शनिवारी चांदीच्या भावात प्रति १ किलो ११०० रुपयाची घट झाली होती.

दरम्यान, कोरोना संकटाने आर्थिक अनिश्चितता वाढवल्याने त्याचे परिणाम कमॉडिटी बाजारावर दिसून आले होते. आठवड्याच्या सुरुवातीला कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली होती. मात्र जागतिक बाजारात बिटकॉईनच्या दरात झालेली उलथापालथ, डॉलरचे अवमूल्यन या घटकांमुळे सोन्याच्या किमती गडगडल्या.

जळगावातील सराफ बाजारात मागील गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात तर ५ हजार ४०० रुपयाने महागले आहे. तर सोन्याच्या किंमतीत देखील काहीसा वाढ झाली आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.०४ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६.४०० रुपये इतका आहे.