जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२२ । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती मोठी वाढ दिसून येतेय. सोन्याने 52,000 रुपयांचा टप्पा पार केला असून चांदी किलोमागे 61,000 रुपयांच्या पुढे आहे. दरम्यान, सोन्याचे भाव 56,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव तेजीत आहेत. Gold Silver Rate Today
वायदा बाजारात आज मंगळवारी सकाळी 10.30 पर्यंत 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 160 रुपयांच्या वाढीसह 52,452 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचा भाव आज 52,475 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर काही वेळातच त्यात थोडीशी घसरण झाली. मात्र त्यानंतर वाढ झालेली दिसून आलीय.
तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आलीय. आज चांदी 612 रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव 61,247 रुपयावर व्यवहार करत आहे. आज सकाळी चांदीचा भाव 61,134 रुपयांवर उघडला. मात्र त्यानंतर वाढ दिसून आली.
दरम्यान, सध्या लग्नसराईला सुरुवात झालेली आहे. अशातच येत्या काळात सोन्याचे भाव 56,000 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तसेच भारतासह जगभरात चांदीची मागणी वाढली आहे. 10 वर्षांत चांदीचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत चांदीचा भाव 1.25 लाख रुपये प्रति किलो होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उच्चांकापासून सोने इतक्या रुपयाने स्वस्त
दरम्यान, या वर्षीच्या मार्च महिन्यात सोन्याचा भाव 54,330 रुपये होता, जो या वर्षातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. यानुसार पाहिले तर 10 ग्रॅम सोन्याचे सध्याचे दर आजही जवळपास 2000 रुपयाने स्वस्त विकले जात आहे.