⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खरेदीची संधी, सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण ; वाचा आजचे नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजारात एक दिवसाच्या भाव वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घट नोंदविली गेली आहे. आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ३७० रुपयाने स्वस्त आहे. तर चांदीच्या दरात घसरण असून आज चांदीचा दर तब्बल ८०० रुपयाने स्वस्त झाले आहे.

त्यापूर्वी काल बुधवारी जळगाव सराफ बाजारात प्रति १० ग्रॅमचा दर २६० महागले होते. तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने स्वस्त झाली होती.

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत होती. या आठवड्यात सुरुवातीचे दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर काल सोन्याच्या दरात वाढ झाली होती. तर आज सोन्याचे दर कमी झाले आहे.

सोन्याची सध्याची वाटचाल पाहता आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. 

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. तर चांदीच्या दराने देखील ७० हजाराचा टप्पा गाठला होता. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळपास ७ हजाराने स्वस्त झाले आहे. 

आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६०८रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,०८० रुपये आहे.

चांदीचा भाव

तर मागील काही दिवसापासून चांदी स्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. आज चांदी ८०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७१,५०० रुपये इतका आहे. गेल्या १० दिवसाचा विचार केल्यास चांदी २४०० रुपयाने स्वस्त झाली आहे.