⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Gold-Silver Rate : सोने पुन्हा स्वस्त, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीचा दर वधारला आहे. आज चांदीच्या भावात ३९० रुपयाची वाढ झाली आहे. याआधीही मंगळवारी सोन्याच्या दरात ३६० रुपयाची तर चांदीच्या दरात ७३० रुपयाची घसरण झाली. सध्या अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव वाढला असून याच पार्श्वभूमीवर येथे लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आगामी काळात सोने दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,१९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,२५० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.-

मागील तीन दिवसापासून सोन्याचे भाव घसरत आहे. सध्या लग्नसराई सुरु असून यात सोने-चांदी मागणी वाढली आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने देखील गुंतवणूकदार धास्तावले आहे. असं असताना सोने दर घसरत आहे.

गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात ६०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात ३६० रुपयाची घसरण झाली आहे. तर गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. चांदीच्या भावात जवळपास १४०० रुपयाची वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

१३ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,५८० रुपये असा होता. १४ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,४४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०३० रुपये इतका नोंदविला गेला. १५ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,२४० रुपये इतका नोंदविला गेला. १६ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६१,६२० रुपये इतका नोंदविला गेला. १७ डिसेंबर (शुक्रवार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६१० इतका आहे.

तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते…
देशात चार प्रकारचे सोने मिळतेआपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना ‘बनविले’ जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.

हे देखील वाचा :