⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | ९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने ; काय आहे आजचा १० ग्रॅम सोने-चांदीचा दर?

९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने ; काय आहे आजचा १० ग्रॅम सोने-चांदीचा दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली. परंतु आज मंगळवारी सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ३०० रुपयाने महागली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र घसरण सुरूच आहे. आज चांदी प्रति किलो ३९० रुपयाने घसरली आहे.

त्यापूर्वी काल जळगाव सराफ बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. काल सोमवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयाने तर चांदी प्रति किलो १११० रुपयाने घसरली होती.

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात (२१सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,३६० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,०१० रुपये इतका आहे. सणासुदीत सोने चांदी स्वस्त होत असल्याने खरेदी करण्याची हि उत्तम संधी आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजी आल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आली. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने ४७,३६० रुपयांवर आले आहे, म्हणजेच गेल्या 1 वर्षात सोने ८,८४० रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सर्वकालीन उच्च पातळी ७९,९८० रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदीदेखील १८,९७० पर्यंत स्वस्त झाली आहे.

गेल्या आठवड्यात असे होते सोन्याचे दर?

शुक्रवारी (१७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,१८० रुपये होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४४,५८० रुपयांवर गेले होते. गुरुवारी (१६ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,००० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२२० रुपयांवर गेले होते. बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३७० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,४८० रुपयांवर गेले होते. मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते. गेल्या पाच दिवसात सोने जवळपास १५०० हजार रुपयाने स्वस्त झाले आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.