⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सोनं-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । मागील गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. त्यामुळे सोने ४८ हजार रुपयांच्या घरात गेले आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर जैसे थे आहे. तर चांदीच्या भावात देखील कुठलाही बदल झालेला नाहीय.

सध्या लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,२३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदीचा दर जैसे थे आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,००० रुपये इतका आहे.

दरम्यान, देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक असेल. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.

मात्र, या नियमातून काही व्यापाऱ्यांना आणि विशिष्ट दागिन्यांना वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील काही जिल्ह्य़ांमध्ये नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हॉलमार्क अनिवार्यतेतून वार्षिक 40 लाख उलाढाल असलेल्या सराफ पेढय़ांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडण्यात येणारे दागिने, सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांसाठीही हॉलमार्क बंधनकारक नसेल.