⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Gold-Silver Rate : खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । देशात ओमिक्रॉनचे संकट वाढल्याने काल भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. भांडवली बाजारात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. असं असलं तरी आज सलग दुसर्या दिवशी बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत मोठी घसरण झाली. जळगाव सराफ बाजार पेठेत आज सोने ३६० रुपयांनी तर चांदी ७३० रुपयांनी स्वस्त झाली. त्यापूर्वी काल सोन्याच्या भावात किंचित ६० रुपयाची घसरण झाली, तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या भावात २० रुपयाची घसरण झाली होती.

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,३७० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६२,८६० इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.-

जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविली गेली. १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रुपयाची वाढ झाली होती, तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या दरात तब्बल १९९० रुपयाची वाढ झाली होती.- गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. चांदीच्या भावात जवळपास १४०० रुपयाची वाढ झाली आहे.

बाजार गडगडला

दरम्यान, काल आठवड्याच्या पहिल्याच सत्रात भांडवली बाजार मोठी घसरण पाहायला मिळाल. याचे मुख्य कारण म्हणजे काही युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. ज्या देशात प्रादुर्भाव वाढला आहे, तेथील सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. याचा परिणाम हा अशियाई शेअरबाजारांवर होत असून, गुंतवणूक झपाट्याने कमी होत असल्याने सेन्सेक्स कोसळत आहे. भांडवली बाजार गडगडला असला तरी दुसरीकडे मात्र, सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

१३ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,५८० रुपये असा होता. १४ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,४४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०३० रुपये इतका नोंदविला गेला. १५ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,२४० रुपये इतका नोंदविला गेला. १६ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६१,६२० रुपये इतका नोंदविला गेला. १७ डिसेंबर (शुक्रवार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये इतका आहे. तर चांदीचे दर किलोमागे ६३,६१० इतका आहे.

हे देखील वाचा :