fbpx

सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा ८००० रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या आताच्या गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आलेय.

गेल्या ५ दिवसात सोने ९७० रुपयाने महागले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोने दर ४८ हजाराच्या घरात होते ते आता ४९ हजाराच्या वर आले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होत आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर ५६,२०० रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सराफा बाजारात सोन्याचे दर ४८,२७० रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात जवळपास ८००० रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

जळगाव सराफ बाजारात सध्या चांदीचा एक किलोचा भाव ६३,५९० रुपये आहे.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच ५० हजार रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज