⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

खुशखबर…! सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज सोमवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयाने स्वस्त झाली आहे. तर चांदी प्रति किलो १११० रुपयाने घसरली आहे. त्यापूर्वी मागील गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८४० रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो २२७० रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात (२०सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,०६० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,४०० रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजी आल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी या चालू महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण नोंदविली गेलीय. सणासुदीत सोने चांदी स्वस्त होत असल्याने खरेदी करण्याची हि उत्तम संधी आहे.

गेल्या आठवड्यात असे होते सोन्याचे दर?

शुक्रवारी (१७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,१८० रुपये होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४४,५८० रुपयांवर गेले होते. गुरुवारी (१६ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,००० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२२० रुपयांवर गेले होते. बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३७० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,४८० रुपयांवर गेले होते. मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याचे दर दोन वेळा महागले तर तीन वेळा स्वस्त झाले आहे. गेल्या पाच दिवसात सोने जवळपास १५०० हजार रुपयाने स्वस्त झाले आहे.

गेल्या आठवड्यात चांदीचे असे होते दर?

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ, तर कधी मोठा चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी चांदी २२७० रुपयाने घसरली होती. तर सोमवारी (१३ सप्टेंबर) चांदी प्रति किलो ६५,०८० रुपये इतका होता. मंगळवारी(१४ सप्टेंबर) चांदी प्रति किलो ६४,७८० रुपये इतका होता. बुधवारी(१५ सप्टेंबर) ६५,०८०, गुरुवारी (१६ सप्टेंबर) ६४,७८० रुपये इतके होता. गेल्या आठवड्यात चांदीचा भाव अडीच हजाराहून अधिकने कमी झाली आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,०६० रुपयांपर्यंत आला आहे. उच्चांक दरापासून सोने दर ९००० रुपयांपेक्षा जास्त दराने स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने मिळत असल्याने सध्या गुंतवणुकीची चांगली संधी आहे.

दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.