दिवाळीपूर्वी सोने-चांदी खरेदी करताय? जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । सणासुदीच्या काळात, भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होतानाचे दिसून येत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली होत आहे. दरम्यान, आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात प्रति १० ग्रॅम  सोन्याच्या किंमत किंचित १० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज चांदी प्रति किलो १२१० रुपयाने महागली आहे. त्यामुळे सणासुदीनिमित्त अथवा लग्न सोहळ्यासाठी सोनं खरेदी करायचा विचार असेल तर लवकर तयारी करा. कारण सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,३९० रुपयाने इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६५,९६० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते

जळगाव सराफ बाजारात या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी सोने पुन्हा महागले आहे. नवरात्रीत सोन्याचे भाव कमी होतील, असे वाटत असताना मात्र सोन्याच्या भावात वाढ झाली. नवरात्र सुरु झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला सोन्याच्या भावात किंचित १०० रुपयाची घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ होत राहिली. १४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात ७४० रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ४९ हजार ०४० रुपयांवर पोहोचले.

सोबतच चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झालीय. चांदीच्या भावात ८ ऑक्टोबर रोजी वाढ झाली होती.त्यादिवशी चांदीच्या भावात २६० रुपयाची वाढ झाली होती त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६२ हजार ६९० रुपयांवर पोहोचली होती. त्यात सततची वाढ होऊन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी चांदी प्रति किलो ६४,३६० रुपयावर पोहोचले होते.

सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात लोक दागिने खरेदी करणे पसंद करतात. परंतु ऐन सणासुदीत सोने आणि चांदीने भाव वाढले आहे. पुढील महिण्यात दिवाळी आहे. या दरम्यान तरी सोने चांदी दर कमी होतील का? याकडे खरेदीदारांच्या नजरा लागून आहे.

सोन्याची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १३ ते १४ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज