fbpx

सोने-चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात मागील तीन चार दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. परतू आज गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर आहे. आज (२० मे) सोन्याच्या भावात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाहीय. तर चांदीच्या भावात आज ११०० रुपयांनी घट झाली आहे.

सोन्याचा भाव

mi advt

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  ४,८९१ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,९१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६५८ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४६,५८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव  

तर आज चांदीच्या भावात घट झाली आहे. आज चांदीत ११०० रुपयाची घट झाली असून प्रति ग्रम ७७.५ रुपये इतका आहे. तर  १ किलोचा दर ७७,५०० रुपये इतका आहे. मागील काही दिवसापासून चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात चांदीच्या भावात तब्बल ६ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज