⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

सोने ४९ हजारांवर तर चांदीने पुन्हा ओलांडली ६४ हजारांची पातळी, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२१ । कोरोनाच्या तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर जगभरात महागाई वाढू लागल्याने सोने आणि चांदी तेजीने झळाळून निघाली. कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे भारतात देखील गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले. जळगाव सराफ बाजार पेठेत सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी वाढ झालीय. आज सोन्याचा भाव ४९ हजारांवर गेला तर चांदीने ६४ हजारांची पातळी ओलांडली आहे.

जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०५० रुपये इतका वाढला आहे. त्यात आज १० रुपयांची किंचित वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६४,५०० रुपये इतका असून त्यात आज तब्बल १,१५० रुपयांची वाढ झाली. याआधी मंगळवारच्या सत्रात सोने १४० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महागली होती.

या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात काहीशी घट झाली होती. सोने ४८५०० रुपयावर आले होते. तर दुसरीकडे चांदी देखील ६२ हजाराखाली आली होती. मात्र अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सोने आणि चांदीचे दर पुन्हा वधारू लागले. गेल्या आठवड्यापासून जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग वाढ दिसून आली. चांदी १६०० रुपयांनी महागली होती. तर सोने ३०० रुपयाने महागले होते. तर आता गेल्या तीन दिवसात सोने १८० रुपयाने महागले तर चांदी १७७० रुपयांनी महागली आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे

हे देखील वाचा :