⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

सोने-चांदीच्या भावात जबरदस्त घसरण ! सोनं हाय रेकॉर्डपेक्षा ९ हजारांनी स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । भारतीय शेअर बाजारात तेजी आल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत ८४० रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रति किलो २२७० रुपयांची घसरण झाली आहे. या चालू महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण नोंदविली गेलीय. सणासुदीत सोने चांदी स्वस्त होत असल्याने खरेदी करण्याची हि उत्तम संधी आहे.

सध्या जळगाव सराफ बाजारात (१८ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,१६० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,५१० रुपये इतका आहे.

सोमवार ते शुक्रवारपर्यंत असे होते सोन्याचे दर?

शुक्रवारी (१७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,१८० रुपये होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४४,५८० रुपयांवर गेले होते. गुरुवारी (१६ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,००० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२२० रुपयांवर गेले होते. बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३७० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,४८० रुपयांवर गेले होते. मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार थेट दोन हजार रुपयांहुन अधिकने घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी  प्रति किलो ६२,५१० रुपयेपर्यंत आली आहे.  सोमवारी (१३ सप्टेंबर) चांदी प्रति किलो ६५,०८० रुपये इतका होता. मंगळवारी(१४ सप्टेंबर) चांदी प्रति किलो ६४,७८० रुपये इतका होता.बुधवारी(१५ सप्टेंबर) ६५,०८०, गुरुवारी (१६ सप्टेंबर) ६४,७८० रुपये इतके होता. या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. गेल्या पाच दिवसात चांदीचा भाव अडीच हजाराहून अधिकने कमी झाली आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर दोन वेळा महागले तर तीन वेळा स्वस्त झाले आहे. गेल्या पाच दिवसात सोने जवळपास १५०० हजार रुपयाने स्वस्त झाले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सोने-चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० वर गेला होता. परंतु त्यात घसरण होऊन आता सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,१६० रुपयांपर्यंत आला आहे. उच्चांक दरापासून सोने दर ९००० रुपयांपेक्षा जास्त दराने स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने मिळत असल्याने सध्या गुंतवणुकीची चांगली संधी आहे.

दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.