⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. तर दुसरीकडे मात्र, चांदीचा भावात वाढ झाली आहे. आज सोमवारी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७२० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलो ३९० रुपयाने वाढली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव वाढत असल्याचे पाहायला मिळाले होते परंतु आज या वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव 

जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,३९० रुपयाने इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,७५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते

ऐन सणासुदीत सोन्याचे भाव कडाडले आहे. नवरात्रीत सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव कमी होती अशी अपेक्षा होती. परंतु भाव वाढीने सोने ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर जाऊन पोहोचले होते.

जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सप्टेबरच्या मध्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पितृपक्ष संपल्यानंतर वाढ सुरू झाली. पितृपक्ष संपताना सोने ४८ हजार तोळा, तर चांदी ६२ हजार रुपये किलो होती. नवरात्र सुरु झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला सोन्याच्या भावात प्रति तोळ्याचा भाव ४७ हजार ९२० रुपये इतका होता. तो नवरात्रोत्सव संपेपर्यंत ४९ हजार तोळ्यावर जाऊन पोहोचला. म्हणजेच नवरात्रोत्सवात सोन्याच्या भावात ११०० रुपयाची वाढ झाली होती.

तर या काळात चांदीच्या भावात देखील वाढ नोंदविली गेलीय. ८ ऑक्टोबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६२ हजार ६९० रुपये इतका होता.तो नवरात्रोत्सव संपेपर्यंत ६४ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. या दरम्यान, चांदी २ हजार रुपयांपेक्षा अधिक महागली. गेल्यावर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये गेल्या दसऱ्याला सोन्याचा भाव ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. यंदा भाव घसरून बाजारात सोन्याचे भाव ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले होते.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (११ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१४० होते, त्यात २२० रुपयाची वाढ झाली होती. मंगळावारी (१२ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,१५० इतका होता. त्यात किरकोळ १० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (१३ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३०० रुपये इतका आहे. त्यामध्ये १५० रुपयाची वाढ झाली होती. गुरुवार (१४ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४९,०४० रुपये इतका आहे. त्यात ७४० रुपयाची मोठी वाढ झाली होती.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.