fbpx

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या जळगावातील आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे दिसून आलेय. आज रविवारी जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २५० रुपयांनी तर २४ कॅरेट सोन्याचा भाव २६० रुपयांनी घट झाली. तर चांदी प्रति किलो १५०० रुपयाने स्वस्त झाले आहे.

त्यापूर्वी काल शनिवार देखील सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांने तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला होता. तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने महागली होती.  

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय.  गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

आजचा सोन्याचा दर

GRF Advt

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६१८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,१८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी १५०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज