⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोने-चांदी पुन्हा झाली स्वस्त ; जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । परदेशी बाजारात खरेदी परतल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. जळगाव सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ झाली होती. परंतु आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. जळगाव सराफा बाजार आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत ३७० रुपयांनी घसरली आहे. त्याचबरोबर या चांदीच्या दरात प्रति किलो ३०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने प्रति १० ग्रॅम ३६० रुपयाने तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने महागली होती.

जळगावमध्ये आठवड्यच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने दरात वाढ होत होती. परंतु आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे आज जळगाव सराफ बाजारात (१६ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,००० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६४,७८० रुपये नोंदवले गेले.

बुधवारी (१५ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३७० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,४८० रुपयांवर गेले होते.  मंगळवारी (१४ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,०१० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,१८० रुपयांवर गेले होते. सोमवारी (१३ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९०० होते. २२ कॅरेट सोन्याच्या दर ४५,२०० रुपयांवर गेले होते. रविवारी हेच दर कायम होते.

सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही तेजी पहायला मिळत आहे. मागील गेले दोन दिवस चांदीच्या भावात घसरण झाली होती. सोमवारी प्रति किलो ६१० तर मंगळवारी ३०० रुपयाने चांदी स्वस्त झाली होती. परंतु तर काल ३०० रुपयाची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगधंदे वाढल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ८ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.