Gold-Silver Rate : सोनं रेकॉर्ड स्तरापेक्षा ७००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे सोने-चांदीचे भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार दिसून येत आहे. आज सोने किंचित महागले आहे. मात्र, दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी घसरण झालीय. आज गुरुवारी सोने १० रुपयांनी स्वस्त आलं आहे. तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त आली आहे. त्यापूवी काल सोने २४० रुपयाने स्वस्त झाले होते; तर चांदी तब्बल ७९० रुपयांनी स्वस्त झाली होती. सध्या सोने पेक्षा चांदीच्या भावात घसरण होत असल्याने चांदीचा प्रति किलोचा भाव ६२ हजाराच्या घरात आला आहे. तर सोने गेल्या वर्षीच्या रेकॉर्ड स्तरापेक्षा जवळपास ७००० हजार रुपयांनी स्वस्त आहे. (Gold Silver Price)

आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,२१० रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे ६१,६२० नोंदवले गेले. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्याच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. सोबतच सध्या जगावर ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) इफेक्टमुळे देखील सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोना (Corona) काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हाच्या आकड्यापेक्षा सध्याचा सोन्याचा दर हा जवळपास ७००० रुपयांनी स्वस्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति तोळा होते. आता सोने ४९,२१० रुपये प्रति तोळा आहे. सोन्याने गेल्या वर्षी २८ टक्के परतावा दिला आहे. त्याच्या आधीच्या वर्षी सोन्याने २५ टक्के रिटर्न दिला होता. कोरोना काळात गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती.

असे होते मागील आठवड्यातील दर?

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.१० डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२२० रुपये इतका नोंदविला गेला.

तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते…
देशात चार प्रकारचे सोने मिळतेआपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना ‘बनविले’ जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -