संक्रातीला दागिने खरेदी करताय? जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारात सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून आली. मात्र, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आणि मकर संक्रातीला सोने दरात किंचित घट दिसून आली. आज सोने दरात ७० रुपयाची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात ६० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूवी काल सोने १२० रुपयाने महागले होते, तर चांदी ७७० रुपयांनी महागली होती.

जळगावातील आजचा भाव? (Gold Silver Price 13 January 2022)
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,८६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३७० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कोरोनाचा परिणाम दिसून येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दर वाढत आहे. जळगाव सराफ बाजारात या आठवड्यात सोने सलग दिवस महागले. तर चांदीच्या भावात पाचव्या दिवशी वाढ नोंदविली गेलीय. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती, परंतु या आठवड्यात सोने ३०० रुपयांनी महागले. तर गेल्या पाच दिवसात दुसरीकडे गेल्या चार दिवसात चांदी १६०० रुपयांनी महागली आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -