fbpx

आज सोनं स्वस्त तर चांदी महाग ; जाणून घ्या जळगावमधील ताजे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । जळगावमधील सुवर्णबाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज रविवारी सोने ३७० रुपयाने स्वस्त झाले आहे. याआधी काल शनिवारी सोने प्रति १० ग्रम ३२० रुपयाने महागले होते. तर आज चांदीच्या दरात वाढ नोंदविली गेली आहे. आज चांदी ५०० महागली आहे. मागील काही दिवसापासून चांदीचा दरात मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात चढउतार दिसून येत आहे. यामुळे सोन्याचे दर ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे. तर चांदी ७६ हजाराच्या वर गेले आहे.

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९३३ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,३३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७९८ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,९८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात ५०० रुपयाची वाढ होऊन चांदीचा १ किलोचा भाव ७७,३०० रुपये आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज