⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

Gold-Silver Rate : सोनं पुन्हा पन्नाशीच्या दिशेने, वाचा आजचे सोने-चांदीचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । जळगाव सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold) २३० रुपयाने महागले आहे. तर चांदीच्या (Silver) भावात देखील वाढ दिसून आली. आज चांदीचा प्रति किलोचा दर ३६० रुपयाने वधारला आहे.

कोरोनाच्या (Corona Virus) नव्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक अनिश्चितता वाढल्याने मौल्यवान धातूचे भाव वाढताना दिसून येत आहे. यामुळे सोने पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

आजचा सोने-चांदीचा भाव?

जळगाव सराफ बाजारात आज सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव ४९,२९० रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे ६२,५८० नोंदवले गेले. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या सोमवारपासून आज शुक्रवारपर्यंत सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले. ६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.१० डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२२० रुपये इतका नोंदविला गेला.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ५५० रुपयाची वाढ दिसून आली तर दुसरीकडे चांदीच्या दरात ३४० रुपयाची घसरण दिसून आली.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. गेल्या ऑगस्ट २०२० ला सोन्याचा भाव ५६२०० वर गेला होता. त्यानंतर हळूहळू भाव कमी होत राहिले. एप्रिल (April 2021)२०२१ च्या सुरवातीला सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव ४५ हजारांवर गेला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर गेले. आता त्यात ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक अनिश्चितता वाढल्याने मौल्यवान धातूचे भाव वाढताना दिसून येत आहे.

शुद्धता तपासणारे अ‍ॅप

आपल्याला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास सरकारनं एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’ हे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देते. या अ‍ॅपच्या माध्यमातून फक्त सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तुम्हाला तक्रारही करता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना तात्काळ तक्रार करण्याची सुविधा आणि माहिती मिळते.