खूशखबर ! सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा घट, वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । मागील दोन दिवसाच्या वाढीनंतर आज पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ३० ते ५० रुपयाने कमी झाले आहे. तर चांदी ९३० रुपयाने स्वस्त झालीय. यापूर्वी गुरुवारी सोने प्रति १० ग्रॅम ४४० रुपयाने तर चांदी प्रति किलो १४० रुपयाने महागले होते.

जळगाव सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसापासून मोठी हालचाल दिसून येत आहे. ४ ऑगस्टपासून निर्बंधात सूट मिळाल्याने सुवर्ण बाजारात उलाढाल आणखी वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीचे भावात मोठी चढ-उतार दिसून येत आहे.

सोने विक्रमी पातळीच्या तुलनेत तब्बल ९००० रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.

जळगावच्या सुवर्ण बाजारात या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति १० ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास २००० हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ऑगस्टला चांदीच्या प्रति १ किलोचा ६९,८०० रुपये इतका होता. तो आता ६,४९० रुपयापर्यंत घसरण झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७५४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,५४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar