आजचा सोने-चांदीचा भाव ; १२ ऑक्टोबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । ऐन सणासुदीत सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात किंचित घसरण झाली आहे. आज मंगळवारी सोने प्रति १० ग्रॅम १० रुपयाने महागले आहे. तर चांदीच्या भावात ६० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल सोने प्रति १० ग्रॅम २२० रुपयाने महागले होते; तर चांदीचा प्रति किलोचा भाव ५६० रुपयाने वधारला होता.

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढत आहे. सणासुदीत भाव कमी होतील अशी अपेक्षा असताना मात्र त्यात वाढ होत राहिली आहे. आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,१५० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६३,१९० रुपये इतका आहे.

दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

मागील गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात सलग पाच दिवस वाढ झाली. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ६१,९७० रुपये प्रति किलो भाव होता. तो काल सोमवारपर्यंत ६३,२५० प्रति किलो इतक्यावर आला आहे. म्हणजेच चांदीच्या भावात १२८० रुपयाची वाढ झाली आहे. तर सोने किंचित महागले आहे. ४ ऑक्टोबर ते ११ पर्यंत सोने ७७० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. तर आज सोन्याचा भाव ४८,१५० रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज ८०५० रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे.

सणासुदीपूर्वी सोनं खरेदी करण्याचा सल्ला
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज