⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सणासुदीत सोने-चांदी महागली ; वाचा आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव

सणासुदीत सोने-चांदी महागली ; वाचा आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या भावात हालचाली दिसून येत आहे. आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. आज सोने प्रति १० ग्रॅम २२० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र वाढ कायम आहे. आज चांदीचा प्रति किलोचा भाव ५६० रुपयाने वधारला आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव 

आज प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,१४० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६३,२५० रुपये इतका आहे. सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

नवरात्रोत्सव सुरु झाल्यानंतर मागील आठवड्यात सोने चांदीमध्ये तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात चांदी सलग ५ दिवस महागली. ५ दिवसात चांदीच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली होती.

गेल्या वर्षी करोन संकटाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला होता. या काळात सोन्याचा प्रती भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. तर आज सोन्याचा भाव ४८,१४० रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज ८०६० रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. तर सोने ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मागील आठवड्यातील असे होते सोने दर?

सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३७० होते, त्यात ४० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९९० इतका होता. त्यात काल ६२० रुपयाची मोठी वाढ झाली होती. बुधवारी (६ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,८५० रुपये इतका आहे. तर गुरुवार (७ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४८,०१० रुपये इतका आहे. आणि (८ ऑक्टोबर) १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९२० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

सोने साठवणुकीबाबत नवे नियम
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत.

या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.