⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आजचा सोने-चांदीचा भाव : ११ जानेवारी २०२२

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारपेठत आज सोन्याच्या दरात किंचित १० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ६० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्थिर होते तर चांदी १९० रुपयांनी महागली होती.

आजच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५७० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,०९० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार सुरु आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने ३ वेळा महागले आहे. तर दोन वेळा स्वस्त झालं आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ५०० रुपयांहून अधिकने घसरण झाली आहे. तर चांदी दरात २१०० रुपयाची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

०३ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१३० रुपये असा होता. ०४ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,१९० रुपये इतका नोंदविला गेला. ०५ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६८० रुपये इतका नोंदविला गेला. ०६ जानेवारी (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७०० रुपये इतका नोंदविला गेला. तर शुक्रवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५६० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,८४० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

नव्या वर्षात स्वस्तात सोने खरेदी
सॉवरेन गोल्ड बाँड स्कीमचे सबस्क्रिप्शन आजपासून (सोमवार) ग्राहकांसाठी खुले झाले आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बाँड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

हे देखील वाचा :