⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Gold-Silver Rate : आजचा सोने-चांदीचा भाव, ११ डिसेंबर २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा (Corona Virus) घटक विषाणू आढळून आल्यानंतर सोने आणि चांदीचे (Gold-Silver Rate) भाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. असं असलं तरी या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात किंचित ३० रुपयाची वाढ दिसून आली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावातही घसरण झाल्याचे दिसून येतेय.

सध्या जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०६० रुपयांवर गेला आहे. तर चांदी ६२,२२० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ४८,५०० रुपयांवर होते. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ दिसून आली होती. त्यामुळे सोने पुन्हा ४९ हजारांवर गेले होते. सलग तीन दिवस सोन्याच्या भावात वाढ नोंदविली गेली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली. तर दुसरीकडे मात्र, या आठवड्याच्या चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. चांदीत जवळपास ७५० रुपयाची घसरण या आठवड्यात झाली आहे.

सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यात ओमिक्रॉन (Omicron) विषाणूमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढीस जाऊ शकतात. गेल्या वर्षापेक्षा सोने स्वस्तच आहे.

या आठवड्यातील असा होता दर?

६ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९६० रुपये असा होता. ७ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,७१० रुपये इतका नोंदविला गेला. ८ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२८० रुपये इतका नोंदविला गेला. ९ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०७० रुपये इतका नोंदविला गेला.१० डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२२० रुपये इतका नोंदविला गेला.