fbpx

सोन्याच्या घसरणीला ब्रेक ; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । मागील दोन सत्रात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव ४७ हजारांखाली आला होता. मात्र आज बुधवारी सोन्याच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम १०० रुपयापर्यंत वधारले आहे. परंतु चांदीच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. आज चांदीत १० ते २० रुपयाची घसरण झाली आहे.

त्यापूर्वी काल मंगळवारी सोन्याच्या भावात ७७० रुपयाची तर चांदीच्या भावात २४१० रुपयाची घसरण झाली होती. तर गेल्या दोन दिवसात जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भाव १७६० रुपयापर्यंत घसरला आहे. तर चांदी ४४६० रुपयाने स्वस्त झाली.

दरम्यान, कोव्हिड-१९ च्या रुग्णांत वाढ, डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण, निर्बंध कमी करण्याबाबत यूएस फेडची निराशाजनक भूमिका, अमेरिकेतील घटलेले बाँड उत्पन्न, गैरकृषी नोकऱ्यांमधील चांगली आकडेवारी आणि यासारख्या इतर घटकांमुळे सोन्याचे दर मागील आठवड्यात घसरले असल्याचे सांगितले जातेय.

या महिन्याच्या १ ऑगस्टला सोने प्रति दहा ग्रॅम दर ४९,४१० इतका होता. त्यात आता जवळपास २४०० ते २५०० रुपयापर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये ९ जानेवारी २०२१ रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन चांदी ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर लगेच ११ जानेवारीला पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर मात्र भाववाढ होत गेली होती. ९ जानेवारीनंतरचे आता १० ऑगस्ट रोजीचे हे भाव सर्वांत कमी आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७०४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४७,०४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,११० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt