सोन्याची वाटचाल पुन्हा अर्धशतकाकडे ; वाचा आजचे सोने-चांदीचे दर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ ऑगस्ट २०२१ । सध्या सोन्याच्या भावात मोठी हालचाल दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात काल बुधवारी सोन्याचा भावात घसरण नोंदविली असता आज गुरुवारी पुन्हा सोन्याचा भावात वाढ झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम ३०० रुपयाने महागले  आहे. त्यामुळे आता सोने पुन्हा ५० हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे.

तर चांदीतील दराला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात ३२० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूवी काल चांदी ३० ते ४० रुपयाने महागली होती.

जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. जवळपास १५०० ते २००० हजाराची घसरण झाली होती. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली.

मागील दोन सत्रात सोन्यामध्ये जवळपास ६७० रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे सोने आणखी कमी होते कि काय याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. मात्र आज सोन्याने यु-टर्न घेतला आणि तेजीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. दरम्यान, आगामी पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० ​हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४९२४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४९,२४० रुपये असून त्यात आज ३०० रुपयाची वाढ झाली आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६९,१९० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -