fbpx

आज सोनं स्वस्त, चांदी महाग, वाचा जळगावातील प्रति तोळ्याचा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ ऑगस्ट २०२१ । डेल्टा व्हेरिएंट आणि अमेरिकेतील आर्थिक स्थिती चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी कमॉडिटीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे मागील काही सत्रात सोने दरात घसरण झाली आहे.

जळगाव सराफ बाजारात काल सोने स्थिर राहिल्यानंतर आज बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम ११० रुपयाने स्वस्त झाले आहे. मात्र, चांदी भावात आज किंचित वाढ झाली आहे. आज चांदी ३० ते ४० रुपयाने महागली आहे. दरम्यान, आगामी पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० ​हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. जवळपास १५०० ते २००० हजाराची घसरण झाली होती. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.

मात्र, आगामी पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० ​हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४६०८ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४६,०८० रुपये असून त्यात आज १०० रुपयाची घसरण झाली. २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३८० रुपये इतका आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६९,५१० रुपये इतका आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज