सोने-चांदी झाली स्वस्त ; तपासा आजचे नव्या किंमती

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । गेल्या जुलै महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आले. परंतु ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. आज जळगाव सुवर्णबाजारात सोन्याच्या १० ग्रमच्या किंमतीत ४४० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत ३६० रुपयाची घसरण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने ५६,२०० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.

त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. आतादेखील सोन्याचा दर साधारण ४७ हजार रुपये प्रतितोळ्याच्या आसपास आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती ५२ हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

१ जुलै २०२१ रोजी जळगाव सराफा बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर ४७,९४० रुपये इतका नोंदवण्यात आला. तर चांदीचा प्रतिकिलो दर ६९,७३० रुपये इतका होता. जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली.  त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८९७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,९७० रुपये इतका आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६९,४४० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -