fbpx

खुशखबर ! ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त ; वाचा आजचा नवा भाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ सप्टेंबर २०२१ । कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर नफावसुलीचा दबाव कायम आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत घट दिसून आले आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ५० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी प्रति किलो ११० रुपयाने स्वस्त झालीय. ऐन सणासुदीत सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. १ ऑगस्ट २०२१ ला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४९,४१० इतका होता. त्यात आतापर्यंत ११ हजार रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव प्रति १ किलो ६९,८०० इतका होता. त्यात मोठी घट होऊन चांदी ५,४१० रुपयापर्यतची घट झालीय.

करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळुहळू रुळावर येत आहे. त्यात ऐन सणासुदीत सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे  ग्राहकांसाठी खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव ५६२०० रुपयांपर्यंत वाढला होता. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चांदीचा भाव ७७८४० रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. त्यात दोन्ही धातू सावरले आहे.

दरम्यान, जगाच्या अर्थव्यवस्थेत येणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८२२ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,२२० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६४,३९० रुपये इतका आहे.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज