⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आजचा सोने आणि चांदीचा भाव : १९ जून २०२१

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. आज शनिवारी पुन्हा जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे. सोबतच चांदीच्या भावात देखील मोठी घट झाली आहे. आज सोनं  प्रति १० ग्रम ६३० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात ११०० रुपयांची घट झाली आहे.

गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात जवळपास दीड हजार रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी ३ हजाराहून अधिक किंमतीने स्वस्त झालं आहे. यामुळे थोडंस का होईना स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे. कोरोना काळात सहा महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने 58 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. सहा महिन्यांपूर्वी 58 हजारांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले आहेत. काल शुक्रवारी सोनं प्रति १० ग्रम ५३० रुपयाने स्वस्त झालं होत.तर चांदी तब्बल ११०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

 आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७७५ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,७५० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५४८ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४५,४८० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव

आज पुन्हा चांदीच्या भावात ११०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव  ७४,००० रुपये इतका आहे.