जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोम्बर २०२२ । यावल शहरातील इलेक्ट्रिकल दुकानाचे गोडावून फोडून इलेक्ट्रिकल सामानाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात फैजपूर रस्त्यावर आशीर्वाद इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान आहे या दुकानाच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले होते. तेव्हा रात्री दुकान बंद व गोडाऊन बंद करून व्यवसाय किरण सुधाकर भंगाळे हे घरी निघून गेले होते. तर सकाळी जेव्हा त्यांनी त्यांचा भाऊ शैलेश भंगाळे हा गोडाऊन वर पाठवले असता गोडाऊनचा कडी कोंडा तुटलेला दिसला आत जाऊन पाहिले असता सामानाच्या चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा यावल पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
गोदामातुन तीन हजार रुपये किमतीचे टेपलींग कंपनीचे राऊटर, तीन हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर, ५०० रुपये किमतीच्या सेटअप बॉक्स असा एकूण साडेसहा हजार रुपयांचा मुद्देमाल येथून चोरीला गेल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे काही जुने साहित्य देखील अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे. तेव्हा या संदर्भात किरण भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहे.