चोरट्यांचे थर्टी फर्स्ट शेळ्या, बोकड चोरी!

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । गोपाळपुरा येथील घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर काही दिवसांवर असताना ही चोरी झाली आहे. ही चोरी शीला नागराज सपकाळे यांच्या घरात झाली आहे. या प्रकरणी सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, भोलेनाथ मंदिर पुलाजवळ शीला सपकाळे या वास्तव्यास आहेत. मोलकरीण म्हणून काम करून त्या उदरनिर्वाह करतात. १९ रोजी रात्री शीला सपकाळे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या व बोकड घराजवळ बांधले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शीला सपकाळे यांना जाग आल्यावर त्यांना घराबाहेर बांधलेले शेळ्या व बोकड जागेवर दिसले नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -