fbpx

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांसाठी भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ही भरती १२० दिवसांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहे.  ७ जुलै अर्ज मागविण्याची अंतिम तारीख असून प्रत्यक्ष मुलाखत ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. 

या पदांसाठी होणार भरती?

mi advt

१) सहाय्यक प्राध्यापक- ३१ जागा

२) वरिष्ठ निवासी – २५ जागा

३) वैद्यकीय अधिकारी – ०९

पात्रता :

गुणवत्ता यादी ही पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या एमडी/एमएस/एमसीएच/डीएम/किंवा समतुल्य अर्हता प्राप्त परीक्षेच्या गुणांवर ठरविण्यात येईल. संशोधन लेख (शोध निबंध) राज्य व अखिल भारतीय स्तरावरील परिषदेतील सहभाग याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. तसेच सदर पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा अधिक असणार नाही. परंतु जे उमेदवार अगोदर शासनाच्या सेवेत असतील अशा उमेदवाराच्या बाबतीत, उच्च वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल करता येईल. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.

नियम व अटी

-जाहीरातीत प्रसिध्द करण्यात आलेली पदसंख्या कमी जास्त करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांनी राखून ठेवलेले आहेत.

-उमेदवार या महाविद्यालया व्यतीरिक्त इतर संस्थेत कार्यरत असल्यास संस्थाप्रमुखांचे ना-हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे व त्या ठिकाणी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरिक्षणात सहभाग नोंदविला किंवा कसे? असल्यास केव्हा? (तारीख नमूद करावी) व तसेच अर्जासोबत जोडावे.

-उमेदवाराची निवड करतांना ज्या उमेदवारांनी बंधपत्रित सेवा (पीजी बॉन्ड) पूर्ण केला नाही अशा उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.

– सदर पदांकरीता उमेदवारांची नियुक्ती निव्वळ १२० दिवसांसाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी स्वरुपात राहील. १२० दिवसानंतर रिक्तपद उपलब्ध असल्यास तांत्रिक खंड देऊन पुन्हा १२० दिवसांसाठी नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.

-निवड झालेल्या उमेदवारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव संस्थेतील कोणत्याही सलग्न रुग्णालयात नेमणूक केली जाईल व काम करावे लागेल व प्रशासनास आवश्यकता असल्यास यापैकी कोणतेही रुग्णालयात नेमणूकीत बदल होऊ शकेल. अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांप्रती साक्षांकित करुन जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही. नंतर कोणतीही कागदपत्रे स्विकारली जाणार नाहीत.

-सदर पदावर कार्यरत असतांना आपणास खाजगी व्यवसाय करता येणार नाही.

-सदर नियुक्ती ही अत्यंत तात्पूरत्या स्वरुपात असल्यामु आपणास या पदावर कायम स्वरुपाचे कोणतेही हक्क राहणार नाही व कायम नियुक्तीचे कोणतेही फायदे अनुज्ञेय नसतील.

-प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. तसेच एम.डी., एम. एस.डी.एम., एमसी. एच. किंवा समतुल्य या सर्व परिक्षेची गुणपत्रिका व प्रयत्न प्रमाणपत्रे गुणपत्रिका नसल्यास परीक्षा पॉईट, ग्रेड प्रमाणपत्र. (ब) सर्व पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी परीक्षेची डिग्री प्रमाणपत्रे व अंतिम वर्षाची गुणपत्रिका (क) एम.एम.सी. किंवा एम.सी.आय. नुतनीकरण केलेली नोंदणी प्रमाणपत्र. (ड) जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र व आवश्यक असल्यास नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र. (ई) जन्म दाखला/शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला. (फ) पॅनकार्ड व आधारकार्डची छायाप्रत इत्यादी कागदपत्रे / प्रमाणपत्राचा एक छायांकित संच अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

-निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्विकारण्यापुर्वी/ रुजू होतांना रु.१०,०००/- अनामत रक्कम म्हणून रोखा शाखेत जमा करणे आवश्यक राहील. सदरील रक्कम नियुक्ती कालावधी समाप्त झाल्यानंतर अथवा पदाचा राजीनामा ०१ महिन्याची पूर्व सूचना देणे आवश्यक राहील, अन्यथा नोटीस न देता पदाचा राजीनामा दिल्यास अनामत रक्कम सरकार खाती जमा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

वेतन श्रेणी :

१) सहाय्यक प्राध्यापक :  रु.१ लाख रुपये/ – इतके ठोक मानधन दरमहा अनुज्ञेय राहील. सदरील वेतन संस्थेत मंजूर असलेल्या मूळ अनुदानातून १० कंत्राटी सेवा या उद्दीष्ठांमधून भागविण्यात येईल.

२) वरिष्ठ निवासी : रु.७१००/- व इतर भत्यासह

३) वैद्यकीय अधिकारी : एम.बी.बी.एस अर्हताधारक यांना रु. ७५,०००/- (अक्षरी रुपये पंच्याहत्तर हजार मात्र) तसेच विशेषज्ञ अर्हताधारक यांना रु.८५,०००/- इतके ठोक मानधन दरमहा अनुज्ञेय राहील. सदरील वेतन संस्थेत मंजूर असलेल्या मूळ अनुदानातून १० कंत्राटी सेवा या उद्दीष्ठांमधून भागविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ  : gmcjalgaon.org

जाहिरात (Notification) : PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज