शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांची बदली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे लोकप्रिय अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.

गुरुवारी विभागाने राज्यातील काही अधिष्ठायांची बदली केली असून त्यात रामानंद यांचा देखील समावेश आहे. नागपूरचे डॉक्टर मिलिंद फुल पाटील यांना रामानंद यांच्या जागी कामकाज सोपवण्यात आले आहे.
कोरोना काळात पदभार स्वीकारलेले अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी रुग्णालय व महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. रुग्णालयातील विविध भ्रष्टाचाराच्या आरोपात शल्य चिकित्सकांकडे बोट दाखविले जात असताना अधिष्ठातांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, अचानक झालेल्या बदलीमुळे एकंदरीत निराशेचा सूर उमटत असून लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना ही बदली रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -