लाेककलावंतांना पेन्शन द्या, अन्यथा ‘गोंधळ’ घालणार : मार्तंड साठे यांचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । वाडे ( ता. भडगाव ) येथे लाेककलावंतांच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात लाेककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी लोककला आर्थिक विकास मंडळ स्थापन करा, दरमहा ५ हजार रुपये पेन्शन, घर व मुलांना नाेकरी द्या, अशा विविध मागणी करत राज्य शासनाला साकडे घालण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास विधान भवनावर जागरण-गाेंधळ करण्याचा इशारा जेजुरी-मल्हार गडाचे विश्वस्त व वाघ्या-मुरळी परिषदेचे मुख्य संस्थापक मार्तंड साठे यांनी दिला. तसेच कलावंतांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यांची उपस्थिती होती 

यावेळी वाघ्या-मुरळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र गुरव, उपाध्यक्ष महिंद्र अहिरे, कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर, संघटक दादा बाबर, मुख्य कार्यकारी सदस्य ज्ञानेश्वर शिंदे, सरचिटणीस राहुल आहेर व अण्णाभाऊ राठोड, जि.प. सदस्या किर्ती चित्ते, सरपंच रजुबाई पाटील, प्रभावती पाटील, चेअरमन विश्वासराव पाटील, शिवाजी चित्ते, भावलाल परदेशी, वाघ्या-मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष सुनील सरदार, सचिव पाटील, संघटक मुरलीधर अहिरे, अशोक कांबळे, नेमीचंद मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष भीमराव मोरे, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष मोरे, अनिल नन्नवरे, सल्लागार पोपट सोनवणे, संजय ठाकूर, पुणे येथील मंगेश शिंदे, अशोक परदेशी, अर्जुन माळी, हिलाल चौधरी, धर्मराज सोनार, प्रेमसिंग भाट, पाचोरा तालुकाध्यक्ष मोहन लोहार, शिवाजी ठाकूर, चाळीसगाव तालुका सल्लागार गिरधर गोंधळी, रामदास अहिरे आदी उपस्थित होते.

कलावंतांनी केला लोकगीतांचा जागर

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. गोंडगावचे नवतरुण वही मंडळ, जगदंबा वही मंडळ, वाडे येथील सरस्वती वही मंडळ, वाघ्या-मुरळी मंडळ, कानबाई माता जागरण मंडळ, गोंधळ पार्टी, शाहीर यांनीसवाद्य उत्कृष्ट लोकगीते गात कला सादर केली. कलावंतांनी लोकगीतांचा जागर अन‌् सवाद्य मिरवणूक खास आकर्षण ठरले. यावेळी जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद जिल्ह्यातील विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन शाहीर विठ्ठल महाजन, अरुण माळी तर अशोक माळी यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज