fbpx

मुलींनो एनडीएला प्रवेश हवा आहे, तर वाचा ही बातमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । सर्वोच्च न्यायालयाने आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी दिलासा देणारा निकाल जाहीर केला आहे. आता मुलींनाही एनडीएची प्रवेश परीक्षा देता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, 5 सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा असून त्यात पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.

पण मुलींना लष्करी सेवेत भरती करून घेण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. ही परीक्षा फक्त पुरुषांना देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण अ‍ॅकेडमी (NDA) आणि नौदल अॅकेडमी परीक्षा (NAE) या दोन परीक्षा महिलांनाही देता याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. याचिकाकर्त्या खूश कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, एनडीएची परीक्षा देता न येणं हा महिलांविरुद्ध होणार भेदभाव आहे. संविधानात स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये महिलांनाही सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे.

केंद्र सरकारनं या याचिकेला विरोध करत म्हटलं होतं की, सैन्यात सामील होण्यासाठी फक्त NDA आणि NNE नाही. सैन्यात भरती होण्यासाठी महिलांना यूपीएससी आणि नॉन-यूपीएससी द्वारे प्रवेश दिला जातो. तसेच एनडीए कॅडेट्सना पदोन्नतीमध्ये कोणताही विशेष लाभ दिला जात नाही, असंही केंद्रानं म्हटलं आहे. पण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं महिलांना सध्या परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. पण या परीक्षेद्वारे महिलांना लष्करात सामावून घेतलं जाईल का? याबाबत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt