⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | … ही तर नौटंकी ! मंत्री गिरीश महाजनांनी उन्मेष पाटीलांवर टीका

… ही तर नौटंकी ! मंत्री गिरीश महाजनांनी उन्मेष पाटीलांवर टीका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२४ । गिरणा नार-पार प्रकल्पावरून माजी खासदार उन्मेष पाटीलांनी गिरणा नदी पात्रात उतरून आंदोलन केलं. या आंदोलनावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टोला लगावला आहे. गिरणा नार-पार योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तरीही हा प्रकल्प होणार नाही, यादृष्टीने गैरसमज पसरविला जात आहे. त्याचाच भाग म्हणून गिरणा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकार केवळ ‘नौटंकी’चा भाग आहे, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांना चिमटा काढला.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. महिला सबलीकरणासाठी पंतप्रधानांनी अनेकविध योजना आणल्या आहेत. त्यातून माता-भगिनींना न्यायासह आधाराची वाट मिळताना दिसत आहे. त्यामुळेच लखपती दीदींच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ते महाराष्ट्र भूमीत येत आहेत. ही बाब जळगावकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कापूस उत्पादकांसाठी ‘गोड’ बातमी
कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वतः अनेक उद्योगपतींशी चर्चा करीत आहोत. गतकाळात कापूस उत्पादकांची कोंडी झाली. ही बाब लक्षात घेता लवकरच त्यांना ‘गोड’ बातमी देऊ, असा दावाही महाजन यांनी केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.