fbpx

उलट मला खडसे यांची किव येते ; गिरीश महाजनांचा टोला

जळगाव लाईव्ह न्युज | २ ऑक्टोबर २०२१ | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन पुन्हा एकदा टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांची स्थिती अतिशय केविलवाणी झाली असून ते माझ्या बाबत जे काही बोलतात त्याचा मला राग येत नाही उलट खडसेंची कीव वाटते. अशा शब्दात आ.गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर टीका केली.

जामनेर येथे गिरीश महाजन यांनी जामनेर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही निवडणुकीवेळी चार चार महीने मतदार संघाच्या बाहेर असुनही ४० हजार मतांनी निवडून आलो. मात्र खुद्द एकनाथराव खडसे व त्यांचे सर्व सहकारी निवडणुकीवेळी मुक्ताईनगर मध्ये उपस्थित असूनही त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. ज्याप्रकारे खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभेतील विकास केला आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

याच बरोबर पुढे ते असे म्हणाले की खडसे असे म्हणतात की मी बी एच आर बाहेर काढला म्हणून माझ्यावर इडी लावली. बी एच आर प्रकरण ४ महिन्यापूर्वीच बाहेर आले आहे. आरोपी गजाआड आहेत.  त्यांचे जावई चार महिन्यापासून जेलमध्ये आहेत. मंदाताई यांनादेखील नोटीस बजावली आहे. मात्र मी किती धुतल्या तांदळाचा हे दाखवण्यासाठी ते असे वक्तव्य करत आहेत. मंत्री बनायला गेले आता साधे आमदारही नाही यावेळी पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन असे म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री बनवले गेले होते मात्र आता साधे आमदारही उरले नाहीत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज