fbpx

जळगावातील पराभवानंतर ‘संकटमोचक’ बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ एप्रिल २०२१ । देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. त्यात पश्चिमं बंगालच्या निवडणुकीमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे भाजपने देशभरातली नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. त्यामध्ये भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा सांभाळणार आहेत. काल गुरुवारी महाजनांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून ते बुधवारी (ता. ३१) सायंकाळी बंगालसाठी रवाना झाले.

महाजन यांना नुकताच जळगाव महापालिकेत झटका बसला होता. भाजपचे येथे बहुमत असताना शिवसेनेने महापौरपद मिळवले. भाजपचे अनेक नगरसेवक फुटले. त्यामुळे पहिल्यांदा महाजन यांना त्यांच्याच जिल्ह्यात पराभव चाखावा लागला. महापौरपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात राहावे लागले. मुंबई येथे उपचार घेऊन मंगळवारी जळगाव येथे आले. त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

यानंतर कोरोनाची लागण होण्यावरून माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची जोरदार जुगलबंदी झाली. दोघा नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र दोघांनी एकमेकांच्या कोरोना लागणबाबत राजकीय टीका करून संशय व्यक्त केला होता. ही लागण खोटी असल्याचे म्हटले होते. मात्र दोन्ही नेत्यांची ही राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली.

गिरीश महाजन यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जायचे असल्याने त्यांनी काल पुन्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना टेस्ट केली असल्याचे सांगण्यात आले. आज त्याचा अहवाल आला असून, ती निगेटिव्ह आली असल्याचे त्यांच्या स्विय सहाय्यकानी सांगितले. या अहवालामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचारासाठी जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ते औरंगाबादमार्गे विमानाने रवाना झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज