जळगावकरांनी संकटमोचक गिरीश महाजनांना दिला भोपळा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या गेल्या १८ महिन्यातील कामांबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जळगाव लाईव्हने सर्व्हे सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या विषयी नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या तर माजी मंत्री जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांना जळगावकरांनी चक्क भोपळा (शून्य) क्रमवारी दिली आहे.

भाजप-शिवसेना युतीला फाटा देत राज्यात महाआघाडी सरकार स्थापन व्हायला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. दीड वर्षात केवळ सत्तांतराच्या चर्चा होत असून तीन पायांवर चालणारे सरकार केव्हाही कोसळेल अशा वावड्या उठत आहेत. दीड वर्षात राज्यात सरकारचे काम समाधानकारक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून कोरोना काळात विकासाचा गाडा मागे पडला आहे.

नेहमी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जळगाव लाईव्ह न्यूजने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या कामांबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी जळगाव लाईव्हने सर्व्हे सुरू केला आहे.

जळगाव जिल्ह्याचे संकटमोचक जामनेरचे आ.गिरीश महाजन यांच्या कामावर जळगावकर प्रचंड नाराज असून विकासाच्या बाबतीत बहुतांश वाचकांनी त्यांना शून्य रेटिंग दिले आहे. जळगाव शहरवासियांनी एक वर्षात कायापालट करण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने जनता जास्त नाराज आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -