गिरीश महाजनांचा व्यायाम करतानाच व्हिडिओ व्हायरल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ ।  भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन राजकारणापलीकडेही या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता गिरीश महाजन यांचा व्यायाम करतानाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याने गीताई फिटनेस ही जीम सुरु केली आहे. हे फिटनेस सेंटर पाहण्यासाठी गिरीश महाजन याठिकाणी आले होते. त्यावेळी जीममधील साहित्य पाहून गिरीश महाजन यांना व्यायाम करायचा मोह आवरला नाही. मग गिरीश महाजन यांनी थोडाही वेळ न दडवता दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली.

विशेष म्हणजे यावेळी गिरीश महाजन नेहमीप्रमाणे शर्ट-पँट अशा फॉर्मल अटायरमध्ये आले होते. तरीही गिरीश महाजन अत्यंत सफाईने दोरीवरच्या उड्या मारताना दिसत होते. ते एकदाही अडखळताना किंवा चाचपडताना दिसले नाहीत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिरीश महाजन हे एरवीदेखील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखले जातात. प्रत्येकाने आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज व्यायाम केलाच पाहिजे, असा संदेश यावेळी गिरीश महाजन यांनी दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -