आमचा पंचवीस वर्षांचा संसार मोडला, पण…लग्न सोहळ्यात गिरीश महाजनांची टीका

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ ।  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा धाकटा मुलगा विक्रम याचा लग्न सोहळा कार्यक्रम पाळधी येथे सोमवारी रात्री पार पडला. दरम्यान, लग्नातही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मिश्किल जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचा गेल्या २५ वर्षापासून चांगला संसार सुरू होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षाचा संसार मोडून टाकला’, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

गिरीश महाजन यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त प्राधान्य देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

या विवाहसोहळ्यासाठी राज्य मंत्रीमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधु-वराला आशिर्वाद दिले. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांचा समावेश होता.


पहा सविस्तर व्हिडिओ :

Thumbnail JLN

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -