आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । भाजप नेते गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. दरम्यान, काल गिरीश महाजन यांनी पक्षांची बैठक घेतली. यावेळी खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याआधीही गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर महाजन हे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. गिरीश महाजन हे गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या बाबत मतदारसंघात दौरे करत आहेत. तसेच शनिवार दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. याबाबत तयारी देखील करण्यात आलेली होती. मात्र शनिवारी सकाळी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी तातडीने स्वतःला कोरोंटाईन करून घेतले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -