अमेरिकेचे डॉ.वसंत‎ जाधव यांना चांदवेडा‎ काव्यसंग्रह भेट‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील अमेरिका स्थित डॉ.वसंत‎ रूपसिंग जाधव यांना चांदवेडा‎ काव्यसंग्रह साहित्यिक रमेश पाटील‎ भेट म्हणून दिला.

आडगावात‎ जन्मलेले डॉ.वसंत जाधव‎ अमेरिकेतील बोस्टन येथील‎ ‘अनलायलम’ या औषध कंपनीत‎ शास्त्रज्ञ होते. नंतर ते कंपनीचे‎ व्हाईस प्रेसिडेंट झाले आहेत. त्यांच्या‎ कामगिरीमुळे चोपडा तालुक्याचे‎ नाव सातासमुद्रापार गाजत आहे.‎ रुपसिंग हबा पाटील व अंजनाबाई‎ पाटील या माता-पित्यांना त्यांनी‎ अमेरिकेची सफर घडवली होती.‎ पंचायत समितीचे माजी सभापती‎ भरत जाधव यांचे ते बंधू आणि‎ पाटील गढीवरील जाधव परिवाराचे‎ ते सुपुत्र आहेत. अनेकांनी त्यांचा‎ यशाचे कौतूक केले आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar